शुभमन गिल ठरला जगातील नंबर वन फलंदाज



सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आत्तापर्यंतचे आठ पैकी आठ सामने जिंकून भारतीय क्रीडा रसिकांना सुखद धक्का दिला आहे. दरम्यान आणखी एक आनंदाची बातमी भारतासाठी येत आहे. टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शुभमन गिल जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज ठरला आहे.आयसीसीने आज जारी केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीनुसार शुभमन आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर-1 फलंदाज आहे. शुभमनने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सोडत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. 

त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा वनडे गोलंदाजांमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला मागे टाकत त्याने पहिले स्थान मिळवले. आता एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलचे ८३० गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबरचे ८२४ गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे ७७१ गुण आहेत. या तिघांशिवाय विराट कोहलीनेही या विश्वचषकात ५०० हून अधिक धावा करून एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत विराट आता चौथ्या स्थानावर आला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत कोहलीचे ७७० गुण आहेत.

Post a Comment

0 Comments