बार्शी - शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या के.डी.धावणे या होत्या.
प्रथम डॉ मामासाहेब जगदाळे व कै.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक भावना सचिन खंदारे, द्वितीय क्रमांक यश कल्याण नलवडे व तृतीय क्रमांक अली शफीक खान तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सिध्दी संतोष पोतदार, द्वितीय क्रमांक नम्रता कल्याण नलवडे व तृतीय क्रमांक भक्ती नितीन गुंड या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्यद्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी,श्री संजय बागल ,श्री आनंद कसबे,श्रीमती एस.जी.कातळे, श्रीमती व्ही.पी.चौधरी सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सोलापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ महेंद्र कदम यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी संस्थेचे खजिनदार तथा कार्यकारिणी सदस्य यशवंतराव चव्हाण सेंटर सोलापूर विभाग,श्री. जयकुमार शितोळे,प्रा अशोक कदम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
0 Comments