बार्शी | लाख रुपये किमतीचे गंठण पळवणारा आरोपी दोन तासात मुद्देमलासह जेरबंद


बार्शी |

दिवाळी बसस्थानकवर निमित्त प्रवास करत असताना बार्शी बस स्थानकावर १० नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान फिर्यादी सुलभा कविश्वर सांगडे रा. मुळ गाव
निजाम जवळा ता. भुम जि. धाराशिव हल्ली जरगनगर कोल्हापुर हि दिवाळी सणा करीता कोल्हापुर येथुन एस.
टी. ने बार्शी एस. टी. स्टॅन्डवर आली होती. फिर्यादी हि वालवड येथे जाण्यासाठी बार्शी ते पाथ्रुड या गाडीकडे
बॅगा घेवुन जात असताना स्टॅडवरील मेडीकलच्या समोर १६/३० वाचे सुमारास अचानक फिर्यादी जवळ एक
२५ते३० वयाचा अनोळखी अंगात निळया रंगाचा त्यावर पांढ-या रेषा व निळी रंगाची पॅन्ट अंगाने सडपातळ
असलेला इसम माझे जवळ आला व त्याने फिर्यादीला जोराचा धक्का देवुन गळयातील सोन्याचे मिनीगंठण
हिसका देवुन जावु लागला असता फिर्यादीने त्यास विरोध करत असताना परत त्याने धक्का देवुन
९०,०००/- रू किंमतीचे गंठण घेवुन तो एस. टया बाहेर जातात त्या गेटमधुन बाहेर पळुन गेला. म्हणुन वगैरे
मजकुरची फिर्याद दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ९६५ / २०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा
दाखल आहे.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बार्शी शहर कडील गुन्हे
प्रकटीकरण शाखेस सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण
शाखेकडील अधिकारी व अमंलदार हे बार्शी शहर व परिसरात गुन्हयाचे अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना
गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील वर्णना प्रमाणे एक इसम शिवाजी कॉलेज
परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे
सपोनि / ढेरे, पोसई / गळगटे, पोहेकॉ/ १६६७ अमोल माने, पोकॉ/७८७ पवार, पोकॉ / २०० उदार यांनी जावुन
पाहणी केली असता तेथे एक इसम संशयीत रित्या फिरत असताना दिसला त्यास ताब्यात घेवुन त्यास नाव
गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर सायबु जाधव रा. सुमित्रानगर यशवंतनगर अकलुज ता.
माळशिरस हल्ली मंगरूळ ता. घनसावंगी जि. जालना असे असल्याचे सांगितले. लागलीच दोन इसमांना पंच
म्हणुन बोलावुन घेवुन त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गुन्हयातील गेला माल
९०,०००/- रू किंमतीचे सोन्याचे गंठण मिळुन आल्याने त्यास पोसई गळगटे यांनी ताब्यात घेवुन अटक
केली आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि दिलीप ढेरे, पोसई महेश गळगटे, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ अमोल माने, पोना मनिष पवार, पोना  वैभव ठेंगल, पोकॉ अविनाश
पवार, पोकॉ राहुल उदार, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ मोहन
कदम, पोकॉ रवि लगदिवे, पोकॉ  अंकुश जाधव, पोकॉ रोहित बागल, पोकॉ इस्माईल बहिरे, पोकॉ  रामेश्वर
मस्के यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments