Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या पिंपरीच्या PSI चं निलंबन


पिंपरी |

पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.
  
दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्याचं निलंबन करण्यात आलं. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.

झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. पण इथं तर स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जातंय. त्यामुळं पोलीसांनी आता त्यांच्याच पीएसआय झेंडेना दोषी ठरवले आहे

Post a Comment

0 Comments