बार्शी |
येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा २ रा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दिनांक २3 ऑक्टोबर रोजी दुपारी १२.४१ वाजता. येडेश्वरी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी प्रगतशील शेतकरी श्री. आबासाहेब दत्तात्रय झालटे यांनी बॉयलरचे सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना सोनवणे यांनी येडेश्वरी शेतक-यांच्या हितासाठी कटिबध्द आहे. गळीत हंगामात २०२३-२४ साठी शेतकरी, सभासद यांना कारखान्यास ऊस देण्याचे आवाहन केले .तसेच दीपावली सणानिमित्त कारखान्याच्या सर्व कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर केले. येणाऱ्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर मधुकर काका बोदर यांनी केले त्यांनी शेतक-यांच्या वतीने बजरंग बप्पा सोनवणे यांचे आभार मानले.तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी येडेश्वरी कारखान्यालाच ऊस गाळपास द्यावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमास येडेश्वरी कारखान्याचे संचालक श्रीधर बाबा भवर, नीलकंठ शेळके, नाना कसपटे, व शेतकरी उपस्थित होते .प्रमुख कार्यकर्ते,ऊस उत्पादक शेतकरी,कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन खांडेकर श्रीराम यांनी केले.
0 Comments