पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं नाकारली आहे.
एकनाथ खडसे यांनी एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने खडसेंना कठोर कारवाईपासून आजपर्यंत दिलासा दिला होता. मात्र, आता हायकोर्टानं ही याचिका फेटाळल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतर काहीजण आरोपी आहेत. दोन वर्षांच्या कारावासानंतर गिरीष चौधरी यांना नुकताच जामीन मिळाला आहे.
0 Comments