सोलापूर |
काेळी बांधवांना आदिवासी प्रमाणपत्र मिळविताना हाेणा-या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी अद्याप सरकारने काेणतीही उपाययाेजना केली नाही. यामुळे राज्य सरकार विरोधात साेलापूरात कोळी समाज आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. यंदाच्या कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना पंढपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा काेळी बांधवांनी सरकारला दिला.सोलापुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कोळी समाजासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची कोळी समाज बांधवांनी राज्य सरकारचा निषेध नाेंदवत होळी केली. कोळी समाज हा सध्या एसटी प्रवर्गात आहे, मात्र कोळी समाज हा आदिवासी आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.
त्यामुळे कोळी बांधवांना सध्या आदिवासी सर्टिफिकेट मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या जाचक अटी रद्द करा अन्यथा येत्या कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना पंढपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा कोळी बांधवांकडून देण्यात आला आहे.त्याचबरोबर येत्या सोमवारी जवळपास 25 हजार कोळी बांधवांचा धडक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे अशी माहिती शरद कोळी (नेता, कोळी समाज) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
0 Comments