महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटीलांची तोफ बार्शीत धडाडणार



बार्शी |

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे व सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची बार्शीमध्ये ६ ऑक्टॉबर रोजी दमदार एंट्री होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज एकत्र करून, जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची श्री शिवाजी महाविद्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकजवळ जाहीर सभा होणार आहे. त्या नियोजनासंदर्भात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आलीय.

 बार्शीमध्ये सकल मराठा समाज जागृत झाला असून, हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित रहाणार असून, रेकॉर्डब्रेक सभेची आतुरता बार्शीकरांना लागली आहे. सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. गावोगावी, खेड्यापाड्यात, वाड्या, वस्तीवर जाऊन सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करून जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त मराठा बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments