सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही, हायकोर्टाचा निर्वाळा



मुंबई |

सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारची पोस्ट शेअर किंवा रिपोस्ट करणे मात्र माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत दंडात्मक कृत्य असणार आहे; असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

आग्र्यातील मोहम्मद इम्रान काझी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलं. या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे त्याच्यावर आयटी कायद्याच्या कक्षा 67 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर कक्षा दरमांदी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments