बार्शी |
बार्शी शहरातील जनार्दन नगर येथे ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम २ लाख १४ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या घटनेची फिर्याद अजय उत्तम सावंत वय २६ रा. जनार्दन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडीतील आरोपीस अटक करून एकूण ८२,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागीने आरोपीकडून हस्तगत केले. जनार्दन नगर येथे घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून १८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व २०,०००/- रु रोख रक्कम असा एकूण २,१४,०००/- रु किंमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे अशा आशयाची फिर्याद दाखल झाली.
सदर फिर्यादीचे अनुषंघाने पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलीस उप निरीक्षक महेश गळगटे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी घटनास्थळास भेट दिवून सदर ठिकाणाची बारकाईने पाहणी करुन अंगुली मुद्रा पथक तसेच श्वान पथक पाचारण केले तसेच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी लागलीच दोन पथके तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवून सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंघाने रवाना केले.
सदर गुन्हयाचे तपासादम्यान गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मीळाली की सदरची घरफोडी ही इसम नामे आप्पा बाळू पवार याने केली आहे, सदर बातमीच्या अनुषंघाने इसम नामे आप्पा उर्फ आप्पासाहेब बाळू पवार, वय ६२ वर्षे, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर यास ताब्यात घेवून त्याचे कडे सदर गुन्हयाचे अनुषंघाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली तरी परंतू सदर इसमाकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबूली देवून गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे
दागीने निवेदन पंचनाम्यादवारे काढून दिल्याने सदर गुन्हयात एकूण २२.५ ग्रॅम वजनाचे सुमारे ८२,०००/- रु
किंमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून सदरचा गुन्हा
घडलेपासून ४८ तासात उघडकीस आणला आहे, गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि दिलीप ढेरे, पोसई गळगटे, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ अमोल माने, पोना मनिष पवार, पोना वैभव टॅगल, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ रविकांत लगदिवे, पोकॉ अविनाश पवार, पोकॉ अंकुश जाधव, पोकॉ रोहीत बागल, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ राहूल उदार, पोकॉ इसामिया बहीरे, पोकॉ मोहन कदम, सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.
0 Comments