'टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…; अजित पवार आले चर्चेत


पुणे |

राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा आधूनमधून सुरुच असते. विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याचे दावे केले जातात. त्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याचे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार स्पष्ट केले जाते. या सर्व प्रकरणात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले जातात. आता पुन्हा ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…असे बॅनर झळकले आहे. पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर हे बॅनर झळकले आहेत.

“टायगर इज बॅक….असे बॅनर आता पुण्यात झळकले आहेत. विद्यामान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात हे बॅनर आहेत. “आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री”, अशा आशयाचे पोस्टर पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून लावण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी हे बॅनर लावले आहे. त्यानंतर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments