सोलापुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न



सोलापूर |

शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना,संभाजी नगर व नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधां अभावी निष्पाप रुग्णांचे झालेले मृत्युकांड, पत्रकार व विचारवंतांवरील भ्याड हल्ले, गोदूताई नगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जड वाहतूक आदीं प्रश्न व मागण्या घेऊन युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची आज फक्त होळी केली. यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल अशा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲड.अनिल वासम यांनी दिला.

गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कल्बर्गी यांच्या नेतृत्वाखाली सरकारी नौकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा.शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळा दत्तक योजना रद्द करा. आरोग्य सुविधा अभावी दगावलेल्या निष्पाप मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करा. गोदूताई परुळेकर नगर येथील जडवाहतुक आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आदीं मागण्या घेऊन राज्य सरकारच्या विरोधात शासन निर्णयाची होळी व निषेध धरणे आंदोलन पार पडले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडले.होळी करताना पोलीस आणि युवा कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या प्रतिमा जाळण्यात आले.

Post a Comment

0 Comments