कपिलापुरी मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावात केली प्रवेश बंदी


परंडा [ दि.३० ऑक्टोबर ] सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परंडा तालुक्यातील कपिलापुरी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन आजी-माजी लोक प्रतिनिधी,पुढारी यांना गावात प्रवेश बंदी केली आसल्याचे ठराव  घेतले असल्याचे दि३०ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालयात निवेदने देण्यात आले आहेत.
        
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा दरम्यान राज्य सरकारने  ३० दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्न मार्गी लावतो आसा शब्द मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला दिला होता मात्र ४० दिवसात सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्न मार्गी लावला नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आसुन परंडा तालुक्यातील कपिलापुरी  गावात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. 
            
महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गावा-गावात विविध प्रकारे आंदोलने करण्यात येत आहेत.मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या अनुशंगाने उपोषण,रस्ता रोको,आजी-माजी लोकप्रतिनिधी,पुढारी यांना गावात प्रवेशबंदी अशी विवीध अंदोलने करण्यात येत आहेत.
           .
       तहसील कार्यालयाला दाखल करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे गावात आजी-माजी आमदार,खासदार, मंत्री तसेच लोकप्रतिनिधी,पुढारी यांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन ५०% च्या आतील व कायद्याच्या चौकटीत बसनारे आरक्षण मिळपर्यत प्रवेश बंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत गावात कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांच्या सभा होणार नाहीत, तसेच निवडनुकीवर बहिष्कार, गावातील विकास कामाचे भूमीपुजन कींवा लोकापर्ण पुढाऱ्याच्या हस्ते केले जानार नाही असे म्हटले आहे.

तसेच सकळ मराठा समाज कपिलापुरी यांच्या वतीने  निवेदनच नव्हे तर आरक्षण मिळे पर्यंत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे ठरले आहे असे  अँड. रणजीत महादेव पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

 तहसिलदार यांना निवेदन देतेवेळी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,जय भवानी जय शिवाजी,मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है,तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय आशा गगणभेदी घोषणानी तहसिल कार्यालयाचा परिसर दुमदुमला होता.
याप्रसंगी कपिलापुरी सचिन पाटील,रंजितकुमार जैन,पितांबर पाटील,परमेश्वर पाटील,सम्राट पाटील,रोहित पाटील,सुजित पाटील,लालाजी पाटील,अभिजीत पाटील,शिवाजी पाटील,बाहुबली मसलकर,संतोष डाके,संदीप कुंभार,अक्षय कुंभार,मनोज जैन,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. रणजीत महादेव पाटील इ.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments