सोलापूर | मराठा आरक्षणासाठी सरपंच चंचला पाटील यांनी दिला राजीनामा, आंदोलनाची धग वाढतेय



मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रांझणी भिमानगर ता माढा ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.रांझणी भिमानगर ता माढा येथे साखळी उपोषणाला सुरूवात  झाली, असून शिवकन्या कु.प्राची सुरेश जाधव व मेजर संजय गोठणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहुन सरपंच प्रतिनिधी पै गणेश पाटील यांनी ही घोषणा केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या महिला सरपंच पदाचा राजीनामा चंचला पाटील यांनी दिला असल्याने आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी व या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून रांझणी भिमानगरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी ठोस भूमिका घेऊन समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी रांझणी भिमानगरच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. चंचला पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येते सरपंच चंचला विजय पाटील या आपल्या पदाचा राजीनामा देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातीतून महिला असून एवढी मोठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल चंचला पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments