मराठा आरक्षणासाठी सिरसाव उपसरपंच केदार पाटील यांचा राजीनामा

सिरसाव  |

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. आरक्षणासाठी व त्यांच्या स्मरणार्थ धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सिरसाव येथील उपसरपंच केदार पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र सरकार आरक्षणाचा विषय गांभीर्यतीने घेत नाही, म्हणून त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे व त्याचा ओबीसी समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments