बार्शी कोर्टाने बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला



बार्शी |

पीडित महिलेवर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बार्शी अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलिस स्टेशन गु.र.नं. 305/2023 अंतर्गत दाखल आरोपी मारुती विश्वंभर गवळी (रा. पेनूर, ता. मोहोळ) याच्यावर बलात्कार व जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आरोपीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. 

आरोपीने बलात्कार व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भा.दंवि कलम ३७६, ३२३, ५०६ प्रमाणे नुसार पीडीत महिलेच्या फिर्यादीवरुन बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, सदर आरोपीने त्याचे वकिलांमार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, सदरील जामीन अर्जावेळी पीडित महीलेचे वकिल अॅड. अमोल कुदळे यांचेमार्फत जामीन अर्जास हरकत घेण्यात आली. तसेच जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी लिखित युक्तीवाद सादर केला. न्यायालयाने पीडितेच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून आरोपी मारुती विश्वंभर गवळी याचा जामीन फेटाळला. याप्रकरणी फिर्यादीतर्फे अॅड. अमोल कुदळे आणि सरकारी पक्ष म्हणून अॅड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.


Post a Comment

0 Comments