सासरमधील छळाने थकून नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या


कोल्हापूर |

जिल्ह्यात सासरी विवाहितांच्या छळाची माालिका सुरुच आहे. मुलगा नाही म्हणून छळ केल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता राधानगरी तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. राधानगरी तालुक्यातील केळोशीपैकी माळवाडीमध्ये नवविवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सविता दत्तात्रय शिंदे (वय 24) असं तिचं नाव आहे. 

अवघ्या तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. सविताच्या नातेवाईकांनी पती, सासू, सासऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सविताचा लग्न झाल्यापासून माहेरी छळ सुरु होता. तिला दीड वर्षांची लहान मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments