कुर्डुवाडी | पत्नीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या पतीला अटक




कुर्डूवाडी : अज्ञात कारणावरुन पत्नीचा एका हत्याराने तुकडे करत खून करून मृतदेह घराशेजारीच पुरल्याप्रकरणी पती उमेश देवकते यास पोलिसांनी अटक केली. ज्योती उमेश देवकते (वय ३८ ) असे यात खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना कुर्डूवाडी- करमाळा रोडवरील देवकते वस्तीवर बुधवारी सायंकाळी घडली असून गुरुवारी उघडकीस आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सदर आरोपी पूर्वी उरळी कांचन येथे राहत होता. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कुर्डूवाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच आरोपीबाबत तपासचक्र फिरवत सदर आरोपीला बुधवारी रात्रीच अटक केली आहे.सदर घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

Post a Comment

0 Comments