सोलापूर । शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या


सोलापूर |

 शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे ही घटना मौजे प्रतापनगर येथील शिवारात घडली आहे.संतोष श्रीमंत चाबुकस्वार वय -२५ (रा.माळी नगर,सोरेगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मौजे प्रतापनगर शिवारातील कडटेप्पा सोमनिग कोरीवाले यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत संतोष चाबुकस्वार मिळून आला होता.

त्यास नातेवाईकांच्या साहाय्याने खाली उतरवून उपचाराकरिता पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.डी.घुगे नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे यांनी यादी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी संतोष चाबुकस्वार यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले आहे.याघटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.

Post a Comment

0 Comments