करमाळा |
करमाळा तालुक्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयात सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी परीरक्षक भूमापक करमाळा यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास करमाळा येथे झाले आहे. तरी पुढील कार्यवाही व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
उपाधीक्षक भूमी अभिलेख करमाळा या कार्यालयात एका व्यक्तीकडून काम करून घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर लाचलुचपर प्रतिबंधक विभागाच्या वतीने करमाळा येथे सापळा लावण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. लवकरच पुढील कारवाई पूर्ण होऊन अधिक माहिती देण्यात येईल.
0 Comments