भगवंत सेना दलाच्या सेवा कार्याला आणखीन एक मोठ यश!

बार्शी |

अजितदादा कुंकूलोळ यांच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस ब्लड बँकेचा सिंहाचा वाटा!

सायंकाळी नऊच्या दरम्यान तानाजी भोसले यांचा फोन आला, घाबरलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली. "माझी पुतणी स्नेहल ही सतरा वर्षाची असून, तिला डेंगू ची लागण झाली असून, तिच्यावर डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. तिची परिस्थिती खालावत चालली असून, तिला तात्काळ प्लेटलेट चढवणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. आम्ही सर्व कुटुंबीय व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला परंतु, तिचा रक्तगट ओ पॉझिटिव असल्यामुळे खूप अडचण येत आहे. आपल्या माध्यमातून काही मदत होत असेल तर करावी." असं बोलताच मी त्यांना तात्काळ शब्द दिला, "काही काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल."

रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रुपवर मॅसेज न टाकता, भगवंत सेना दलाचे सदस्य रामराजे देशमुख यांना फोन करून बोलावून घेतले व लागलीच सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे अजित दादा कुंकूलोळ यांच्याशी संपर्क करून सदरील घटनेची माहिती सांगितली. दादांनी तात्काळ ब्लड बँकेमध्ये फोन करून चौकशी करून, दोन मिनिटांमध्ये मला परत फोन केला. "धीरज काही काळजी करू नका व्यवस्था होईल, लगेचच फॉर्म भरून सॅम्पल द्या." दादांचे हे वाक्य ऐकून आम्ही सुटकेचा श्वास टाकला...

क्षणाचाही विलंब न करता रक्ताचे सॅम्पल घेऊन फॉर्म भरून ऑफिशियल प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि माझ्यासह सर्व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

यानंतर भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी रात्री हॉस्पिटल मध्ये जाऊन स्नेहल आरोग्याची चौकशी करत, तिला व नातेवाईकांना धिर दिला. आता स्नेहल वर योग्य उपचार चालू असून, तिची आरोग्य परिस्थिती स्थिर आहे. 

जीवघेण्या आजाराच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी, भगवंत सेना दल फक्त एक माध्यम आहे. खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक अजित दादा कुंकुलोळ आणि इंडियन रेडक्रॉस ब्लड बँक यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे.


Post a Comment

0 Comments