देवेंद्र फडणवीसांनी मतदानासाठी मराठा समाजाला ग्राह्य धरू नये - मनोज जरांगे पाटील



मुंबई |

देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा समाजाला ग्राह्य आणि गृहीत धरू नये, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वर्षांपूर्वी नारायणगडावर एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी याच नारायण गडावरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मराठा बांधवांना दिला होता, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे काही वर्षांपूर्वी नारायणगडावर एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी याच नारायण गडावरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मराठा बांधवांना दिला होता. मात्र मराठा समाजाला अद्यापही टिकणारं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मतदानासाठी आता मराठा समाजाला ग्राह्य आणि गृहीत धरू नये.

Post a Comment

0 Comments