परंडा | कोकणे सरांच्या क्रांती अकॅडमी परंडा येथे गोमय बीज राखी उपक्रम साजरा



परंडा |
 
महा एनजीओ फेडरेशन द्वारा सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून गोमय बीज राखी महाराष्ट्रभर पोहचविण्याचा संकल्प श्रीशेखर मुंदडा संस्थापक : महा एनजीओ फेडरेशन व नवनिर्वाचित महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष यांनी केला होता. महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी यासाठी विशेष समन्वय साधला.

महा एनजीओ सोबत सलग्न असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील श्रीमंतराजे प्रतिष्ठाण,कपिलापुरी या संस्थेने कोकणे सरांचे क्रांती अकॅडमी परंडा या ठिकाणी गोमय राखी हा उपक्रम राबवला.
तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती व सांस्कृतिक वार्तापत्र आयोजित लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा या विशेषांकाचे प्रकाशन परंडा येथे श्रीमंतराजे प्रतिष्ठाण  संस्थेच्या पुढाकाराने कोकणे सरांचे क्रांती करिअर अकॅडमीच्या सभागृहात करण्यात आले.
माणसाला आपला इतिहास माहीत असावा व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात आपल्या भागातील हुतात्म्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे असे मत पुस्तक प्रकाशन प्रसंगी पो नि इज्जपवार यांनी व्यक्त केले.तसेच गोमय बीज राखी या उपक्रमाबद्दल महा एनजी फेडरेशन महाराष्ट्र व श्रीमंतराजे प्रतिष्ठाण याचे विशेष कौतुक केले.गोमय बीज राखीला  बाजारपेठेत स्थान निर्माण करणे गरजेचे आहे असे इज्जपवार यांनी आपल्या मनोगतात म्हटले. यावेळी पो नि विनोद इज्जपवार व रामराजे शिंदे,पांडुरंग कोकणे, ग्रामसेवक भोसले,अँड.अनिकेत काशीद,शहाजी चौधरी,लक्ष्मण गोरे,अँड.रणजीत महादेव पाटील यांना राख्या बांधण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कोकणे यांनी केले तर आभार शहाजी चौधरी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments