कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; विषप्राशन करून संपवले जीवन

दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारी व सततच्या नापिकीला कंटाळून  राहत्या घरातच विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे निदर्शनास आली. पुरुषोत्तम नामदेव चातुरकर (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी पुरुषोत्तम चातूरकर यांच्याकडे १०.७८ आर शेती असून ते फावल्या वेळी मोलमजुरीही करीत असे. १६ सप्टेंबरला सायंकाळी शेतातून आल्यानंतर रात्री त्यांनी विष घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ते घरातच पडून असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. सततच्या नापिकीमुळे व हाताला कामच नसल्यामुळे घराचा गाडा कसा हाकायचा? या विवंचनेत गत अनेक दिवसांपासून ते होते.

Post a Comment

0 Comments