मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद; ईडीच्या आरोपांवरून अजित पवारांचे प्रत्युत्तर



आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे भाषण करून काम होत नाही त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर सभेत केले. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सत्तेची गरज सांगितली त्याच मार्गाने मी गेलो, असे पवार यावेळी म्हणाले. 

राज्याचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, लोकांच्या कामासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. आमच्याबद्दल चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीच पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? अशी विचारणा त्यांनी केली. 

अजित पवार पुढे म्हणाले की, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहिलं आहे, बळीराजावरचं दुष्काळाचं सावट दूर करावं हे अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाही. कोल्हापूरतील सलोखा कुणी बिघडवत असेल तर सत्तेत असताना देखील आम्ही त्याला विरोध करु. 


Post a Comment

0 Comments