मुंबई |
केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा केली. तब्बल ४५ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीमध्ये आमदार अपात्रता विषय आणि लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून माधुरी दिक्षीत, जळगावमधून उज्ज्वल निकम, तर धुळ्यातून प्रतापराव दिघावकर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनिल देवधर यांच्या नावाची चर्चा झाली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.
अमित शहांनी चार नावांची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याचं सांगितलं जातं. यातील दोन नावांची चर्चा यापूर्वीपासूनच सुरु होती. सुनिल देवधर यांना पुण्यातून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रतापराव दिघावकर हे माजी अधिकारी असून तिकीट मिळण्याच्या अटीवरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जातं. त्यांना धुळ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. माधुरी दिक्षीत यांना मुंबईतील एका मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नव्याने काही नावे चर्चेत आल्याने राजकीय चर्चांना तोंड फुटणार आहे.
0 Comments