चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या व पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या



नाशिक |

चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची दुर्दैवी प्रकार घडला आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पतीने देखील गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, विशाल निवृत्ती घोरपडे, २९ रा. धनश्री विशाल घोरपडे, २६ दोघे रा. तुळजा भवानी निवास, इच्छामणी नगर, आडगाव शिवार, नाशिक हे दोघे पतीपत्नी आपल्या अडीच वर्षाच्या मुलागा आणि विशालची आई यांच्या सोबत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून विशाल याला धनश्री हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने या दोघा पतीपत्नीमध्ये भांडण होत होते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हि भांडणे जास्तच सुरु झाली होती. 

 या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्याने. विशालच्या आईने आपल्या अडीच वर्षाच्या नातवाला घेऊन बाहेर असलेल्या महादेव मंदिरात जाऊन झोपली होती. बुधवार (ता. १३) रोजी सकाळी उठून विशालची आई घरी आली असता तिला मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले तर सून धनश्री हि रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये पडलेली दिसून आल्याने भयभीत झालेल्या आईने आडगाव पोलिसांना माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असता, विशालने अंदाजे रात्री बारा वाजेनंतर आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा टाकून हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

Post a Comment

0 Comments