सोलापूर |
सोलापूर शहरातील उत्तर सदर बझार,लष्कर येथून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे श्री संगमेश्वर देवाच्या दर्शन घेऊन भीमा-सीना नदीच्या संगम स्थानावर स्नान करण्यासाठी गेलेला भाविक हेमंतकुमार म्हारेप्पा पुंडा (वय 45 वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शनिवार,दि.2 सप्टेबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे एपीआय प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पीएसआय सूर्यकांत बिराजदार,एएसआय जाधव,पोलीस अंमलदार कर्नाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ त्या ठिकाणी भोई मनगोळी गावचे रहिवाशी कमलाकर डिरे व वांगी गावचे रहिवाशी सागर नगरे या दोघांनी अथक परिश्रमाने मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मंद्रूप पोलीसांनी दिली आहे.
0 Comments