पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन; 'या' राज्यांना होणार फायदा



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (24 सप्टेंबर) 9 नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला आहे. या सर्व नवीन वंदे भारत ट्रेन्स आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरातील अनेक मार्गांवर धावत आहेत, यात आता आणखी नऊ रेल्वे गाड्यांची भर पडणार आहे.

या नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत.या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समध्ये महिला लोको पायलटचाही समावेश आहे.


Post a Comment

0 Comments