बार्शी |
बार्शी नगरपरिषदमध्ये राज्यसंवर्ग मधील अधिकारी पदाच्या ३८ पैकी २७ जागा रिक्त आहेत. त्या तात्काळ बदलीने अथवा थेट भरती ने तात्काळ भरण्यात याव्या अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते आणि बानपा कामगार संघाचे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे समक्ष भेटून केली आहे.
याबाबत अक्कलकोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बार्शी अ वर्ग. दर्जाची जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद आहे. अधिकारी दर्जाची ३८ पद मंजुरी असताना फक्त ११ लोक काम करत आहेत. त्यातही बांधकाम , पाणीपुरवठा ,विधुत, संगणक इत्यादी विभागात सक्षम अधिकारी नाहीत हे चित्र अत्यंत वाईट. असून यामुळे राज्य व केंद्र सरकार च्या विविध विकास योजनाच्या दर्जावर परिणाम होतो आहे
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरन विभागातून प्रतिनियुक्ती वर आलेले आहेत त्यांच्या कडेच काही महिने बांधकाम विभागाचा पदभार देण्यात आलेला होता पाणीपुरवठा आठ आठ दिवस विस्कळीत होत असताना मेकॅनिकल शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या अभियंता यांच्याकडे बांधकाम चा पदभार होता. त्यामुळे तात्काळ बार्शी तील अधिकारी यांची रिक्त असणारी २७ पदे बदलीने किंवा इतर नगरपालिका महापालिका इथून तात्पुरते काम पहावे या जिल्हाधिकारी यांच्या अख्त्यारीत आदेशाने भरण्यात यावी अशी मागणी केलेली आहे यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
0 Comments