बार्शी |
तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे उंबरगे येथील विविध योजनेच्या माध्यमातून ८० लाख रूपये मंजूर विकास कामांचे भूमिपूजन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून उंबरगे गावासाठी ८० लाख रुपयांची कामे मंजूर केल्याबद्दल सभापती ॲड.रणवीर राऊत यांचा समस्त गावकऱ्यांनी नागरी सत्कार केला.
उंबरगे येथे सभापती रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,अंतर्गत पाईपलाईन व विहीर करणे यासाठी ५४ लाख,जन सुविधा योजनेअंतर्गत काँक्रीट रस्ता करणे यासाठी ५ लाख,दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी ६ लाख,१५ व्या वित्त आयोगातुन बंदीस्त गटार करणे यासाठी ५ लाख,२५/१५ योजने अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
बार्शी शहर व तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. यावेळी उपस्थित नागरिकांनी बऱ्याच वर्षांपासून न झालेली कामे ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचे सांगितले तसेच सभापती रणवीर राऊत यांनी गावकऱ्यां बरोबर संवाद साधत आमदार राजाभाऊ राऊत हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शहर व तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामे मंजुर करुन आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी आडत व्यापारी सचिन मडके,माजी पंचायत समिती सदस्य सुमंत गोरे,भोयरेचे सरपंच पप्पू टेकाळे,युवा उद्योजक तथा भाजपा आगळगाव गणाचे विभाग प्रमुख मुकेश डमरे,उद्योजक राहुल मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत धस,मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे,चेतन शिंदे,चुंबचे सरपंच बालाजी सांगळे, कोरेगावचे सरपंच जयसिंग माने,खडकोणीचे सरपंच हनुमंत कोथमिरे,भानसळेचे सरपंच धनाजी हिरे, कुसळंबचे सरपंच शिवाजी खोडवे,वाणेवाडीचे सरपंच बापूसाहेब गरदडे,कळंबवाडीचे सरपंच गणेश मुंढे,आगळगावचे उपसरपंच वैभव उकिरडे,वालचंद मुंढे,विनायक जाधव,श्रीमंत जाधव, रामेश्वर भांगे,चेअरमन दत्ता जाधव,सत्यवान भांगे,दत्ता जाधव, मन्मथ गुळवे,सचिन विधाते,अमर मुंढे,नेताजी विधाते, श्रीधर कदम,दत्ता विधाते,गुणवंत विधाते,अरूण मुंढे,सागर विधाते,बालाजी विधाते तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments