आंतरजातीय विवाह अनुदानसाठी ८ हजाराची लाच घेणारा लिपिक ताब्यात



हिंगोली |

दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनेमध्ये वाढ होताना पाहावयास मिळत आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला मिळणाऱ्या ५० हजारांच्या अनुदानासाठी लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ४ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास शासनाकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. हा प्रस्ताव सादर केल्यानंतरही हा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. हे अनुदान लवकर मिळवून देण्यासाठी संबंधित लाभार्थ्यास जि.प.च्या समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक बिभीषण विष्णुपंत पांचाळ याने लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची तशी इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून सापळा रचला असता जि.प.च्या समाजकल्याण विभागात पांचाळ यास आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Post a Comment

0 Comments