मुंबई |
मंत्रिपदाच्या दर्जाचं पद माझ्याकडं आहे. पण ते मंत्रिपद नाही. त्यामुळे मला बोलावलं नसावं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण कठोर भूमिका घेतलीत. त्यामुळे आपल्याला बोलावलं नसावं, असं वाटतं का असं विचारण्यात आलं. तेव्हा एवढ्या हलक्या कानाचे लोक सध्या सरकारमध्ये नाहीत. त्यामुळे तसा काही विषय असावा असं नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.
मंत्रिपदाबाबतही त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं बच्चू कडू म्हणालेत. आजपासून दिव्यांगाच्या दारी अभियान सुरु होणार आहे.संपूर्ण राज्यात फिरुन दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही दिव्यांगासाठी एक धोरण आखणार आहोत. 16 ॲाक्टोबरपर्यंत राज्यात फिरुन डिसेंबरपर्यंत धोरण तयार करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणालेत.
0 Comments