शेतकऱ्याकडून १५ हजाराची लाच घेताना पंढरपुरातील नायब तहसीलदार 'एसीबी' च्या जाळ्यात


सोलापुर |

शेतीची जागा खरेदी करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्याकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपुरातील नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील एक शेतकरी शेतीला रस्त्यासाठी दहा गुंठे जागा खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावे म्हणून प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार ए. एस. तोंडसे यांच्याकडे परवानगी मागत होता. मागील अंदाजे सहा महिन्यापासून शेतकरी यासाठी वारंवार विनंती करत होता. मात्र परवानगी देण्यासाठी तोंडसे संबंधित शेतकऱ्यास २० हजार रुपयांची लाच मागत होते. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तत्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक सापळा रचला.

 दरम्यान १५ हजाराची लाच स्वीकारताना तोंडसे रंगेहाथ सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस कर्मचारी अतुल घाडगे, सलीम मुल्ला, राहुल गायकवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments