उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश



उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानीच ही बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.

निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारी करा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीत केली आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कल्याण, अंबरनाथ, कळवा, बोरिवली,दहीसर, मागाठाण्याचे पदाधिकारी हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या.

उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना तीन महत्त्वाचे आदेश काय?

  *  निवडणुकांसाठी तयार राहा. निवडणुका कधीही होऊ शकतात.
  *  मतदान यादीमध्ये ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा.
  *  ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे त्यांच्याशी संपर्क करुन अडचणी सोडवा.

 

Post a Comment

0 Comments