बार्शी | दोन लाखाची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल ; मोठया अधिकाऱ्याच्या नावाने शालार्थ आयडीसाठी मागितली लाच



बार्शी |

शाळेतील शिपाई हनुमंत काळे याचे आत्महत्या प्रकरण ताजे असताना बार्शी तालुक्यातील एका शिक्षकाने शालार्थ आयडी साठी दोन शिक्षकांकडून प्रत्येकी एक लाख असे दोन लाख लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने अँटी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक सचिन प्रकाश उकिरडे, लोकसेवा विद्यालय, आगळगांव, ता. बार्शी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरू आहे. 

आरोपी नामे सचिन उकिरडे यांनी औदुंबर उकिरडे, विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांचेशी तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेशी संबंधीत दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झालेले असल्याचे सांगुन, औदुंबर उकिरडे यांचेकरिता म्हणुन तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेतील एका शिक्षकांचे शालार्थ आयडीचे केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये असे २ लाख रुपये लाचेची मागणी करून लोकसेवक औदुंबर उकिरडे यांचेवर त्यांनी पदिय नात्याने आवश्यक असलेले काम करण्याबद्दल प्रभाव टाकण्याकरिता अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्षक सचिन उकिरडे यांचेविरुध्द बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यची प्रक्रिया सुरु आहे. 

ही कारवाई गणेश कुमार, पोलीस उपअधीक्षक, उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापुर पोलीस अंमलदार सपोकी सायवण्णा कोळी, पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोशि रवि कटखिळे, पोशि समके, चालक पोह गायकवाड, पोशि शाम सुरवसे सर्व नेमणुक - अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे यांनी केली.

Post a Comment

0 Comments