वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीने पोलीस कर्मचाऱ्यांसह खोपोली ग्रामस्थ भावुक; रथातून मिरवणूक काढत दिला निरोप


ठाणे |

खोपोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची अलिबाग पोलीस स्टेशनला पदोन्नतीने बदली झालेल्या शिरीष पवार यांना खोपोली पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच खोपोली ग्रामस्थांनी अतिशय भावुक वातावरणात निरोप दिला. 

खोपोली पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा सांभाळत कार्यक्षम रहाणारे शिरीष पवार हे कर्मचारी आणि ग्रामस्थांमधे त्यांच्या चोख कार्यासाठी लोकप्रिय झाले. ही लोकप्रियताच साश्रू नयनाने निरोप देताना दिसत होती. शिरीष पवार यांची बदली झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि खोपोली पोलीस ठाण्यात अक्षरशः गाव जमा झाला. कर्मचाऱ्यांनी हातात फुलं दिली , फुलांचा वर्षाव केला, औक्षण करत रथामधून मिरवणूक काढत अनोख्या पध्दतीने निरोप समारंभ आयोजित केला .  ही लोकप्रियता केवळ एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नसून त्यांनी अवघ्या दोन वर्षांत केलेल्या अभूतपूर्व अशा कार्याची आहे.

 शिरीष पवार यांच्या निरोप समारंभाचे हे दृश्य म्हणजे पोलीस क्षेत्रातील उत्तम कार्याला नागरिकांनी दिलेल्या कौतुकाच्या पावतीचं उत्तम उदाहरण आहे. पोलीस खात्यातील 'सिंघम' अशी ओळख असणारे शिरीष पवार यांची अलिबाग पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. पवार हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरले होते तर सर्वसामान्यांचे प्रश्न त्याच आत्मीयतेने सोडवतात, त्यामुळेच ते लोकप्रिय अधिकारी म्हणून गणले जातात. त्यांच्या पुढील कार्यास आणि उज्वल भविष्यासाठी 'मल्टिकोअर क्रिएशन', 'खमक्या इंडिया' व 'भाग्यकांता प्रतिष्ठान' च्यावतीने हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments