धाराशिव | गावठाण जागेवर अतिक्रमण केले म्हणून पिंपरीचे सरपंच अपात्र


धाराशिव|

  धाराशिव तालुक्यातील मौजे पिंपरी (बेलदार) येथील सरपंच दत्तात्रय कशीद यांनी गावठाण जागेवर अतिक्रमण  केले म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केले होते.   जिल्हाधिकाऱ्यांनी  पारीत केलेला आदेश विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. 

मौजे पिंपरी ( बेलदार ) ता. धाराशिव येथील ग्रामपंचायत निवडणूक होऊन दत्तात्रय कशीद ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. ग्रामपंचायत मधील सरपंच असलेल्या महीला सरपंच यांना  जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले नंतर दत्तात्रय काशीद यांची सरपंच म्हणून नियुक्ती झाली. 

उप-सरपंच अजीत बेलदार यांनी सदरील सरपंच काशीद यांनी गावठाण  मोकळ्या जागेवर अतिक्रमण केले बद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना तत्काळ चोकशी अहवाल सादर करनेस सांगितले असता त्यांनी तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर केला. 

सदर अहवालाच्या अनुषंगाने सुनावनी होऊन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दत्तात्रय काशीद यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र केले. सदर आदेशाविरुद्ध सरपंच यांनी  विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केले. अपील विभागीय आयुक्तांकडे सुनावणीस आले असता तक्रारदार यांच्या वतीने ॲड. सुशांत चौधरी व ॲड. अतुल देशमुख (उस्मानाबाद) यांनी युक्तिवाद केला. तक्रारदार यांच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे तसेच तोंडी युक्तिवाद ग्राह्य धरून विभागीय आयुक्त यांनी सरपंच दत्तात्रय काशीद यांनी दाखल केलेले अपील फेटाळून लावले.




Post a Comment

0 Comments