विधानसभा अध्यक्षांच्या 'त्या' नोटिशीला ठाकरे गट उत्तर देणार नाही; समोर आलं महत्त्वाचं कारण



मुंबई |

विधीमंडळाच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला  ठाकरे गट उत्तर देणार नसल्याची माहिती मिळत आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र, मुदत संपूनसुद्धा ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलेलं नाही. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देण्यात आलं आहे.  

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे यामध्ये 16 आमदारांनीच नोटिशीला उत्तर देणं गरजेचं नसल्याचं मत ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटिशीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदरांना नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

 

Post a Comment

0 Comments