उधारीचे पैसे मागितले म्हणून श्रीपत पिंपरीमध्ये एकाचे पेटवले घर ; ४ जणांवर गुन्हे दाखलबार्शी |

बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे पूर्व वैमनस्यच्या रागातून ट्रॅक्टरच्या किराणा दुकानाच्या उधारीचे पैसे दिले मागितले म्हणून एकाचे घर पेटवल्याची घटना घडली आहे. यामध्ये अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले असून नानासो चांगदेव ताकभाते (वय ४२) रा. श्रीपत पिंपरी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १०  जुलै रोजी रात्री एकच्या सुमारास पैशाच्या उधारीच्या कारणावरून ४ जणांनी मिळून घराला आग लावली आहे. या आगीमध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच १३ ए ए ०७०९, फॅन, धान्याचे सहा कट्टे, वापरती कपडे व मुलाचे पुस्तके जळून अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले, असून फिर्यादीच्या पत्नी प्रियंका यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने पळून नेले आहेत. उधारीचे पैसे जर मागितले तर तुझे घर जाळले आहे परत जर आमच्या नादी लागला तर तुला मारून टाकीन. नानासो ताकभाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्जुन चांगदेव पवार, हरिचंद्र भगवंत ताकभाते व हनुमंत मनोहर ताकभाते तिघे जण रा. श्रीपत पिंपरी ता. बार्शी व एका अनोळखी इसमाच्या विरोधात बार्शी तालुका पोलिसात भादवी कलम ३२३,३२७,३४,४२७,४३६,५०४  कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments