'तिने' ओवाळलं अन् आपसूक उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत पाणी आलंमुंबई 

'आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे,' हे उद्गार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. जळगाव शहरात कार्यक्रमासाठी जात असताना देवेंद्र फडणवीस यांना 'मनोबल' या शाळेतील एका दिव्यांग मुलीनं पायाने ओवाळलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत तरुणीचे आभार मानले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावातील दिव्यांग मुलांच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करुन मुलांशी संवाद साधला. प्रकल्प पाहणीवेळी एका दिव्यांग तरुणीने फडणवीसांना पायाने टिळा लावून औक्षण केलं. यावेळी फडणवीस यांनी तिचे आभार मानत या प्रसंगाने त्यांच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

Post a Comment

0 Comments