पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना पोस्ट केलेल्या फोटोंमुळे अमृता फडणवीस नेटकऱ्यांच्या रडारवर



मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस ह्या आपल्या गाण्यामुळे आणि विरोधकांवर करत असलेल्या टीकेमुळे चांगल्याच चर्चेत असतात महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती तसेच त्याच्या टीकेला नेटकऱ्यांनी सुद्धा चांगलेच खडेबोल सुनावले होते अशातच आता पुन्हा एकदा पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. 

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्यानिमित्त अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणदिना निमित्त अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केले आहेत मात्र या फोटामध्ये त्यांनी विचित्र कपडे परिधान केल्याचे दिसून येत आहे. अमृता फडणवीस यांना या फोटोंवरून ट्रोल केलं जात असून नेमकं आपल्याला म्हणायचं काय आहे हे कळायला अवघड आहे, असं नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्नच विचारला आहे.

अमृता फडणवीस ट्विटमध्ये म्हणतायत कि, काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात, असं म्हणत अमृता यांनी फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले असून चांगलंच खडेबोल सुनावले आहे. 

अमृता फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत की, पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला मिठी मारा. स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करा. निसर्गाच्या सानिध्यात जा, असं हे फोटो शेअर करताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments