भविष्यातील पिढीचे नुकसान टाळण्यासाठी एमआयडीसीला विरोध करू नका - आमदार राजेंद्र राऊतबार्शी |

तालुक्यातील भातंबरे/तांबेवाडी येथील औद्योगिक वसाहत भुसंपादन संदर्भात आमदार राजाभाऊ राऊत यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला आहे.

   बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भातंबरे/तांबेवाडी येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित होणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत बैठक पार पडली.भविष्यातिल पिढीचे नुकसान टाळण्यासाठी एम.आय.डी.सी.ला विरोध करु नका,कोणावरही अन्याय होऊ देणार नाही शासनाच्या नवीन धोरणानुसार भूसंपादित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळेल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी संतोष निंबाळकर,कौरव माने,तहसीलदार संजीवन मुंढे,केशव घोगरे तसेच इतर प्रमुख प्रशासकीय अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments