'त्या' बातमीवरून राष्ट्रवादी आक्रमकमुंबई 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी नामांतराला विरोध केल्याचं सांगत मी संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार, असं वक्तव्य केल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र शरद पवार यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यासंदर्भात ट्वीट करत शरद पवारांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच हे वृत्त देणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. 'छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. एका वृत्तवाहिनीने याबाबत खोडसाळपणा केला आहे. या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत,' असं ट्वीट सूरज चव्हाण यांनी केलं आहे.

 

Post a Comment

0 Comments