"पर्यावरण दिनानिमित्त भाग्यकांता प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम ; भगवंत मंदिर परिसरात ठेवल्या विविध झाडांच्या कुंड्या...!"बार्शी |

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शीतील 'भाग्यकांता प्रतिष्ठान'ने श्री भगवंत मंदिरामध्ये विविध झाडांच्या कुंड्या ठेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या झाडांची देखभाल ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही वर्तमान परिस्थितीमध्ये काळाची गरज बनली आहे येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व सुंदर पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. येत्या काळामध्ये बार्शी शहरासह तालुक्यांमध्ये भाग्यकांता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यावर भर देणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आली.

'भाग्यकांता प्रतिष्ठान'च्या माध्यमातून बार्शी शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठी भव्य दांडिया उत्सव, जागतिक महिला दिन व आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात येते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी शहरासह तालुक्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.

यावेळी भाग्यकांता प्रतिष्ठानचे संस्थापक तथा मार्गदर्शक मुरलीधर चव्हाण, भगवंत देवस्थान विश्वस्त मुकुंद कुलकर्णी, भाग्यकांताचे संस्थापक विश्वस्त गिरीश केसकर, विजय शिखरे,सचिव गणेश शिंदे, सहसचिव श्रद्धा धर्माधिकारी, कोषाध्यक्ष महेश उकिरडे, संचालक स्वराज लोखंडे, संचालिका विद्या चव्हाण, मल्टीकोर संचालक अमित इंगोले,रोहन नलावडे, एसपी स् कॅफे संचालक निर्भय चव्हाण, डिजिटल मीडिया राज्य कार्यकारणी सदस्य सूर्यकांत वायकर,भगवान चांडगे गुरुजी,सचिन धर्माधिकारी, वृक्ष संवर्धक रवी देवकर बरोबरच श्रीभगवंत भाविक भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.
आभार कोषाध्यक्ष सचिन उकिरडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments