बोलेरोमधून वाहतूक होणारी पाचशे लिटर हातभट्टी दारु जप्त; भरारी पथकाची कारवाई



सोलापूर |

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथे एका बोलेरोमधून वाहतूक होणारी पाचशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली. 

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या बातमीनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गाव ते ति-हे तांडा रोडवर  सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना बोलेरो जीप क्र. एच एच १ ३ ए क्यू ०१९७  या वाहनातून पाच रबरी ट्युबमध्ये अंदाजे १०० लिटरप्रमाणे पाचशे लिटर हातभट्टी दारु वाहतूक होतांना आढळून आली. वाहनचालक विश्वनाथ दत्तात्रय जाधव, (वय ३७) वर्षे, रा. बटर बाबू गल्ली, मुळेगाव ता. दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यात वाहनाच्या किंमतीसह एकूण रु. चार लाख पंचविस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप-अधीक्षक तथा निरिक्षक ब विभाग सदानंद मस्करे, निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अशोक माळी, अण्णा कर्चे, विनायक काळे यांच्या पथकाने पार पाडली. 
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकण्यासोबतच हातभट्टी दारुच्या वाहतूक व विक्रीवर कडक लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे. मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारु विरोधात मोहिम राबवून १२८ गुन्हे दाखल केले असून ७८५०  लिटर हातभट्टी दारु १,१२,४५० लिटर गुळमिश्रित रसायन, इतर साहित्य व पाच वाहने असा एकूण सदोतीस लाख दहा हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments