डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिष्टचिंतन



पुणे - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवार (१० जून) रोजी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला असून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अभिष्टचिंतनाच्या दिवशी हारतुरे न आणता आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.राजा माने, राज्य कार्यकारिणीचे श्री.महेश कुगांवकर, शामल खैरनार, केतन महामुनी, माऊली म्हेत्रे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अजिंक्य स्वामी, पुणे शहराध्यक्ष महेश टीळे-पाटील, कार्याध्यक्ष विनायक बेदरकर या सर्व मान्यवरांनी कोथरूड जनसंपर्क कार्यालय येथे मा. चंद्रकांत पाटील यांची भेट घेत अभिष्टचिंतनानिमित्त विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती व महेश टीळे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्राचे जायंट किलर’ हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, प्रसिद्ध अभिनेते अभय चव्हाण, ट्रेटापॅकचे भगवान माने इ. मान्यवर देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments