महेंद्रसिंह धोनी खेळणार शेवटचं IPL?आयपीएलच्या प्ले ऑफसाठीचे सामने रंगात आले आहेत. यावर्षी देखील चेन्नई सुपरकिंग्स चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई टीमने 12 सामने खेळले असून 7 जिंकले आहेत तर 4 सामने गमावले आहेत. धोनी हे शेवटचं आयपीएल खेळणार का, तो निवृत्ती घेणार का यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. याच दरम्यान चेन्नईच्या मॅनेजमेंटकडून धोनीच्या निवृत्तीवर मोठा खुलासा करण्यात आला आहे.

इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार मॅनेजमेंटमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, धोनी कधी निवृत्ती घेणार याची कल्पना त्याने कुणालाही दिली नाही. एक ना एक दिवस असा नक्कीच येईल की तो निवृत्तीची घोषणा करेल हे आम्हालाही माहिती आहे. त्याला आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तो ती पूर्ण केल्याशिवाय निवृत्ती घेणार नाही. चेन्नई टीमला आपला पुढचा कर्णधारही निवडायचा आहे. सध्या आमच्याकडे फारसे पर्याय नाहीत. बेन स्टोक्स दुखापतींशी झुंज देत असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवू शकत नाही. जडेजाला संधी होती पण तो जबाबदारी सांभाळू शकला नाही. धोनीने आम्हाला आयपीएल 2023 च्या शेवटी निवृत्ती घेण्याबद्दल तरी  काहीही कल्पना दिली नाही.

Post a Comment

0 Comments