बार्शी | शेंद्री येथे सरपंचाची घरासमोर लावलेली बुलेट पेटवली ; दोघा जणांवर गुन्हा दाखलबार्शी |

बार्शी तालुक्यातील शेंद्री गावचे सरपंच महादेव चव्हाण यांनी त्यांच्या घरासमोर लावून ठेवलेली बुलेट दुचाकी गाडीवर रात्रीच्या वेळी डिझेल टाकून पेटवण्याचा प्रकार घडला आहे, याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ भांडणाचा राग मनात धरून ३ मे च्या मध्यरात्री सरपंचाच्या घरासमोरील बुलेट  क्रमांक एम एच १३ आर ९३०१ ही पेटवून देऊन सुमारे ७० हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी शशिकांत देवराव सुतार रा. शेंद्री तालुका बार्शी व अण्णा भीमा ठोंगे रा. हिंगणगाव ता. परांडा भादवी कलम ३४, ४३५, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरकोळ भांडणाच्या रागातून दोघांनी बुलेट गाडी पेटवल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments