कुठल्या पुढाऱ्यांचा - पुढारी नाही सामान्य माणसाचा आमदार ...


-  सुनील दळवी (वाकीघोलकर)

 
कोल्हापूर जिल्हातील एका  गावातील "मंडळाचा अध्यक्ष" ते  राधानगरी-आजरा-भुदरगड मतदार संघाचा "आमदार" असा नेत्रदीपक प्रवास करत - अध्यक्ष आमदार झालेत.  या प्रवासात अनेक अडचणींचा सामना प्रकाशरावजी आबिटकरांना करावा लागला,  प्रथम २००९ ची निवडणूक लढवली अन् त्यात पराभव झाला, पण त्यामुळं खचून न जाता निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून साहेबांनी पुन्हा मतदारसंघात लोकांच्या व्यथा जाणून घेण्यास, मदतकार्यास सुरुवात केली.   

तत्कालीन अध्यक्षांनी "गाव - गाडा" पिंजून काढला, प्रत्येक गावात येणाऱ्या अडचणी समजून घेत , संघर्ष यात्रा काढत तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं नेतृत्व तयार होत गेलं, २०१४ ला सत्ताधारी मंडळींच्या "ध्येयहिन, बेदूंध अनं धनशक्तीला शह देत अध्यक्षांनी  विधानसभेचं मैदान लोकशाहीच्या मार्गाने अनं गोरगरीबांच्या साथीने प्रचंड मोठ्या मताधिक्याने मारले...  आणि  "राधानगरी-आजरा-भुदरगड" मतदारसंघाला एक "अभ्यासू, कर्तुत्ववान, कार्यक्षम"  लोकप्रतिनिधी मिळाला. 'यावेळी केवळ एकटे अध्यक्ष आमदार झाले नव्हते, तर गावगाड्यातील प्रत्येक सामान्य माणसाला स्वतः आमदार झाल्यासारखं वाटत होत.
   यानंतर मात्र आमदार साहेबांनी पायाला भिंगरी बांधून लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी  विकासकामांचा डोंगर खेड्यापाड्यात उभा केला... सुरवातीच्या टप्प्यात साहेबांनी मूलभूत सोयसुविधा पुरविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केलं.  "लाईट, पाणी, रस्ते, आरोग्य अन शिक्षण" या मूलभूत गोष्टी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहचवून, दुर्गम भागातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याच महत्त्वपूर्ण काम केलं,  शिवाय याअगोदर मतांच्या गोळाबेरीजेत कमी संख्याबळामुळं डावललं गेलेल्या वाकिघोलसारख्या कित्येक वाड्यावस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आमदार साहेबांनी मार्गी लावल, यामुळे सामान्य माणसाच्या मनातून गट- तट  बाजूला जात विकास आणि प्रकाश आबिटकर हे सूत्र जमून आलं....,
       
गावगाड्यातील गटातटाच राजकारण विसरून विकासाच्या, सहकार्याच्या जोरावर आमदारांनी सामान्य माणसाला आपलस करून घेतलं.  2019 ला पुन्हा विधानसभेच बिगुल वाजल, यावेळी मात्र आमदारांना मतदारसंघात मिळणारा सामन्याचा प्रतिसाद पाहून, राजकीय वारसा लाभलेले नेते खडबडून जागे झाले, कोणत्याही परिस्थितीत विकासाची ही गंगा आता रोखायची त्या उद्देशाने एकत्र येऊन कार्यरत झाली... पुन्हा एकदा "बलाढ्य धनशक्ती राजकारणी विरुद्ध आमदारांसोबतची सामान्य जनता" असच काहीस निवडणुकीच चित्र स्पष्ट होत गेलं. प्रत्येक गावातून मिळणारा निकाल हा हेच सांगत होता की  इथ कुठल्या जाती पातीच राजकरण नाही तर तळागाळात काम केलेल्या माणसाच्या कर्तुत्वाची पोच पावती म्हणून प्रत्येक गावातून निर्णायक आणि लीड घेत विकासाच्या आणि जनशक्तीच्या बाजूने निकाल लागला अन् दुसऱ्यांदा आबिटकर साहेब आमदारपदी विराजमान झाले...
 
   आता मात्र साहेबांचं नेतृत्व कसलेल होत, मतदारसंघाची नस अन् नस साहेबांनी ओळखली , मूलभूत सोईसूविधांची पूर्तता जवळजवळ सगळीकडे पोहचली होती. आता लक्ष्य होते, शेतात राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्याला कष्टकर्याला नवसंजीवनी देऊन आर्थिकृदृष्ट्या सक्षम करण्याचे... त्यासाठी साहेबांनी या पंचवार्षिक मध्ये सिंचनावर भर देऊन बळीराजाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नवनवीन प्रकल्पांची उभारणी करून कामांना सुरूवात तसेच लोकार्पण देखील केले.  त्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी धामणी , नागणवाडी, सर्फनाला, झापाचीवाडी , यासारखे प्रकल्प  हाती घेऊन, पूर्णत्वकडे नेले.  यातून मतदारसंघात एक प्रकारची हरितक्रांतीच घडून आली..... पाण्यासाठी अनेक उपाय जोजना राबवत हा माणूस खेड्यापा्ड्यात शेतकऱ्याच हात बळकट करण्यासाठी आपल महत्त्वपूर्ण योगदान देत आहे ही लाख मोलाची बाब आहे, असा आमदार  आपल्या मतदार संघाला मिळाला हे आपल भाग्य.....
   महाराष्ट्रात नेते अनेक झाले पण बोटावर मोजण्या इतक्याच  लोकांच्या नशिबी  लोकनेता होण्याचं भाग्य लाभलं ...ज्यांची नाळ गावगाडयाच्या विकासाशी निस्वार्थ जोडली गेली, त्यांनाच लोकनेता म्हणून लोकांनी मिरवल..
 त्यामध्ये स्व. आर. आर. पाटिल, विलासरावजी देशमुख, सदाशिवराव मंडलिक, आजचे हसन मुश्रीफ, शेतकरी नेते राजू शेट्टी, बचू कडू इतकीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नावे सापडतील, उद्या या यादीत आमदार प्रकाश रावजी आबिटकर साहेबांचं नाव अभिमानाने घेतल जाईल अस या माणसाचं कर्तुत्व आहे.... 
    
 कोणत्याही जातीधर्माच्या चौकटीत न अडकता, अथवा कोणत्याही एका धर्माला विकासाचा केंद्रबिंदू न मानता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे विकासकामांच्या माध्यमातून संवाद साधन हीच साहेबांची ओळख खरी ओळख ज्या साठी मला निवडून दिलय तिथं,मी तीळमात्र कमी पडणार नाही हे वास्तव घेऊन जगणारा काम करणारा हा आपल्याला लाभलेला आलवीया माणूस...
  परवा ऐका माणसानं प्रश्न केला आमदार साहेब इथली लोकसंख्या किती आपण काम किती कोटीची करता त्यावेळी साहेबांनी दिलेलं उत्तर ...मी मत मिळावीत म्हणून काम करतोय आशी भावना ठेवू नका मला या मतदार संघाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य, राजकारणा पलीकडे ,इथल्या लोकांची सेवा करण आणि इतरांपेक्षा केलेल्या कामाचा आनंद हा स्वतः ला मिळणं यापेक्षा मोठी आपल्या कामाची पोचपावती नाही, हे उत्तर  माझ्यासारख्या सामान्य माणसाला सामाजिक बळ आणि ऊर्जा देणार आहे... असा स्वतः कामाप्रती आदर असणारा अभ्यासू लोकप्रतिनधी भेटला हे मतदार संघाच वास्तविक भाग्य.. जे मी अनुभवंल... 
गेल्या  9 वर्षांच्या कालावधीत गट- तट नाही माणूस प्रमाण मानून काम करणारा आमदार अशी ओळख निर्माण करण इतकी साधी बाब नाही, साहेब तुमच्या कार्याला कर्तुत्वाला ऐक युवक म्हणून नेहमीचं शुभेच्या राहतील, सामान्य माणसाची अशीच सेवा सुरू राहुदे ,तुमच्या आजच्या  कामातून उद्या " लोकनेता "  ही उपाधी मिळायला वेळ लागणार नाही.
 
सरतेशेवटी मी इतकंच सांगेन की साहेबांची काम करण्याची पद्धत अशीच राहिली तर लोकनेते ही उपाधी आबिटकर या नावापुढं लागायला फार वेळ लागणार नाही.  
  कारण हा कुठल्या पुढाऱ्यांचा, पुढारी नाही तुमचा-आमचा पुढारी हाय..... ज्याची निवड अचूक असावी,यावर मतदार संघाच्या विकासाच भविष्य अवलंबून आहे.....इतकचं ✍️

                  सुनिल दळवी
                 (वकिघोलकर)
                 9881485165

Post a Comment

0 Comments